हॅकिंगचा धोका होणार दूर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 September 2012

हॅकिंगचा धोका होणार दूर

हॅकिंगचा धोका होणार दूर 
लंडन : सायबर गुन्हेगाराच्या टोळ्यांकडून संगणक व मोबाइल हॅक करण्याच्या प्रकारांमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. संगणक हॅक करून या टोळ्या अनेकांची गुप्त माहिती बेमालूमपणे पळवतात, मात्र भविष्यामध्ये या समस्येपासून मुक्ती मिळू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रज्ञांच्या चमूने एक अनोखी सिलिकॉन चिप विकसित केली असून तिच्या मदतीने दहा वर्षाच्या आत हॅकिंगला बळी पडणारे क्वांटम संगणक मोठय़ा प्रमाणावर तयार केले जाऊ शकतील. त्यामुळे मोबाइल आणि खासगी संगणकांत उपलब्ध माहिती हॅक केली जाऊ शकणार नाही. स्कॉटलंडच्या एबरडीन शहरात सुरू असलेल्या विज्ञान परिषदेमध्ये यासंबंधीची घोषणा करण्यात आली. क्वांटम संगणक बनवण्याची प्रक्रिया तूर्तात प्रारंभिक टप्प्यात आहे, मात्र त्यांच्या मदतीने अतिशय जटिल समस्यांवरही समाधान शोधता येऊ शकेल व तेही सध्याच्या संगणकांपेक्षा कितीतरी अधिक वेगाने. या चिपची निर्मिती करणार्‍या चमूमध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञांसह हॅरियट-वॉट विद्यापीठातील संशोधकांचाही समावेश आहे. त्यांच्या दाव्यानुसार, त्यांनी जी सिलिकॉन चिप बनवली आहे, तिच्या मदतीने क्वांटम संगणकांच्या मोठय़ा प्रमाणावर उत्पादनाचा रस्ता खुला होणार आहे. या प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रॉनऐवजी प्रकाशाच्या एक-एक कणांमध्ये बदल केला जातो. नजीकच्या काळाबाबत विचार केला तर ही प्रक्रिया वा चिपपासून बनलेल्या मोबाइलला हॅक करणे वा त्याचे कोड तोडणे अशक्य होऊन बसेल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS