वादग्रस्त एसीपी ढोबळेंची बदली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 September 2012

वादग्रस्त एसीपी ढोबळेंची बदली



वादग्रस्त एसीपी ढोबळेंची बदली
मुंबई- साहायक पोलिस आयुक्त वसंत ढोबळे यांची मुंबई पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागातून बदली करण्यात आली आहे. पश्‍चिम मुंबईच्या वाकोला विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 

पोलिस विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गृहविभागाने काल रात्रीच्या सुमारास वसंत ढोबळे यांच्या बदलीचा आदेश काढला. पर्यटनाशीसंबधित एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आश्‍वासन दिले होते, की मुंबईला पुन्हा नाईट लाइफ मिळवून दिली जाईल. पोलिसांकडून होणारी अनावश्‍यक कारवाई रोखली जाईल. ढोबळेंची बदली करण्यावर चव्हाण यांनी भर दिला होता, असे समजते.

वसंत ढोबळे यांनी गुन्हे शाखेला आपल्या कामाचा अहवाल द्यावा, असा आदेश मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त सत्यपालसिंह यांनी गेल्या महिन्यात दिला होता. त्यापूर्वी ढोबळे थेट मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांना आपल्या कामाचा अहवाल देत होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS