काँग्रेस राज ठाकरेंना पोसत आहे - अबू आझमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 September 2012

काँग्रेस राज ठाकरेंना पोसत आहे - अबू आझमी








काँग्रेस राज ठाकरेंना पोसत आहे - अबू आझमी


नागपूर - अबू आझमी कुठेही गेले तरी त्यांच्या टीकेचा रोख हा राज ठाकरे यांच्याकडेच असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नागपूरमध्ये त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकेचा भडीमार केला. तसेच काँग्रेस त्यांना पोसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

निवडणूकीच्या काळात काँग्रेसने राज ठाकरेंना सात कोटी रुपये दिले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. काँग्रेस आणि राज यांच्यावर एवढा मोठा आरोप तुम्ही करत आहात तर त्याचे काही पुरावे आहेत का, या प्रश्नावर ते म्हणाले, पुरावे नसले तरी ही माहिती मला गुप्तचर विभागाच्या वरिष्ठ अधिका-याकडून मिळाली आहे. त्यामुळे ती सत्य असल्याचा दावा त्यांनी केला. 

ठाकरेंवर आरोप करताना आझमी म्हणाले, राज वारंवार हिंदी भाषेचा अवमान करतात. धर्माधर्मात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करतात. मात्र, सरकार त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही. नुकताच त्यांनी मुंबईत विनापरवानगी मोर्चा काढला तरीही कारवाई होत नाही. याचा सरळ अर्थ काँग्रेसचा त्यांना छूपा पाठिंबा आहे.  

दाऊदसोबतच्या आरोपांबाबत ते म्हणाले, या आरोपांची तपासयंत्रणांनी चौकशी केली आहे. त्यात कोणतेही तथ्य आढळून आले नाही. समाजवादी पक्ष स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने आहे. त्यासाठी आंदोलन करण्याचीही आमची तयारी असल्याचे ते म्हणाले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS