या वेळी महासंघाचे मुंबई सरचिटणीस सिद्धार्थ कदम, भाकपाचे मुंबई सचिव प्रकाश रेड्डी, श्याम सोनार आदी पदाधिकारी उपस्थित होते. 26 हजार कोटींचे पालिकेचे बजेट आहे. त्यामानाने शिक्षणावर खर्च होत नाही. प्राथमिक शिक्षण खूप गरजेचे आहे. 1331 शाळांच्या माध्यमातून 4 लाख 20 हजार मुले आज पालिकेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. कोठारी कमिशनप्रमाणे शिक्षणाला पालिकेने प्राधान्य दिले पाहिजे. असे असताना त्यांचे खाजगीकरण करणे योग्य नाही, असे रेड्डी म्हणाले.मुलांना पावसाळी गणवेश हिवाळ्यात मिळतो, सहा महिन्यांनंतर पुस्तके, दूध प्यायल्याने विषबाधा, शाळांचे छप्पर गळके, जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतीमध्ये ही मुले शिक्षण घेत आहेत. शिक्षणासारख्या पवित्र कार्यातही भ्रष्टाचार करू पाहणार्या व त्याचे खाजगीकरण करणार्या पालिकेचा डाव आम्ही वेळीच हाणून पाडत आहे. भविष्यात तीव्र आंदोलन करून मुलांना व शिक्षकांना न्याय मिळवून देऊ, असे भारिपचे मुंबई संघटक प्रतीक कांबळे म्हणाले. |
Post Top Ad
07 September 2012
Home
Unlabelled
पालिका शाळा खाजगीकरण विरोधात भारिपचे आंदोलन
पालिका शाळा खाजगीकरण विरोधात भारिपचे आंदोलन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment