शिवसेने पाठोपाठ मनसेही 'भारत बंद' मध्ये सहभागी नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 September 2012

शिवसेने पाठोपाठ मनसेही 'भारत बंद' मध्ये सहभागी नाही


शिवसेने पाठोपाठ मनसेही 'भारत बंद' मध्ये सहभागी नाही




मुंबई - डिझेल दरवाढ आणि रिटेलमधील थेट परकीय गुंतवणुकीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि इतरही विरोधीपक्षांनी गुरुवारी 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या बंदमध्ये राज्यातील प्रमुख विरोधीपक्ष आणि एनडीएचा घटकपक्ष असलेली शिवसेना सहभागी होणार नाही, असे सुत्रांकडून समजले आहे.  शिवसेने पाठोपठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही बंद मध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. 

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे बंद बाबातची अधिकृत भूमिका आज मांडणार आहेत. मात्र, शिवसेनेच्या बंद मधील सहभागाबद्दल सुरुवातीपासून संभ्रम निर्माण झालेला होता. आज सकाळी (रविवार) मुंबईत निघालेल्या मोर्चातही उद्धव यांनी बंद बद्दलची ठोस भूमिका जाहीर न करता, शिवसेनाप्रमुख जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे मोघम वक्तव्य केले होते. त्यामुळे शिवसेना बंद मध्ये सहभागी होणार नाही असा अंदाज सकाळपासूनच व्यक्त होत होता. मात्र, शिवसेनेच्या या निर्णयामुळे एनडीएच्या 'भारत बंद'ला राज्यात खो बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS