राज यांचा महाराष्ट्र धर्म म्हणजे "वरून कीर्तन आतून तमाशा' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 September 2012

राज यांचा महाराष्ट्र धर्म म्हणजे "वरून कीर्तन आतून तमाशा'


राज यांचा महाराष्ट्र धर्म म्हणजे "वरून कीर्तन आतून तमाशा' 
मुंबई- इंदू मिलच्या जागेवर वाचनालय उभारण्याची राज यांची सूचना अत्यंत बालिश आणि हास्यास्पद आहे. 21 व्या शतकात वेबसाईटवर घरबसल्या कोणतेही पुस्तक वाचता येते. त्यामुळे अशी कल्पना कालबाह्य आहे, अशी सणसणीत टीका रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी आंबेडकर भवन येथे झालेल्या धिक्कार सभेत केली. राज यांचा महाराष्ट्र धर्म म्हणजे "वरून कीर्तन आतून तमाशा' आहे, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला. 

राज यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांच्या भाषणात सवंगपणा असतो. त्यांना प्रत्येक वेळी माघार घ्यावी लागते. त्यामुळे भविष्यात त्यांनी अभ्यास करूनच बोलावे, असा सल्ला त्यांनी दिला. ते म्हणाले, की संसद व संविधानाची व्यंगचित्राद्वारे विटंबना करणाऱ्या असीम त्रिवेदीला पाठिंबा देणारे राज गुजरातच्या विकासाचे गोडवे गातात. मुंबई प्रांताच्या गुजराती मुख्यमंत्र्यांनी 105 मराठी माणसांना गोळ्या घालून ठार केल्याचे राज विसरले का, असा सवाल त्यांनी केला. 

राज यांचा महाराष्ट्र धर्म हुतात्मा चौकात मरण पावला काय, असा सवाल करतानाच इंदू मिलची जागा आम्ही आंदोलन करून मिळविली आहे. त्या जागेवर काय करायचे आणि काय नाही याचा निर्णय सरकार व आम्ही घेऊ, त्यात राज यांनी नाक खुपसण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले. 

शिवसेनेचा पदोन्नतीतील आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत केवळ राजकीय लाभासाठी मैत्री करणाऱ्या रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणाले. रिपब्लिकन दिनाच्या कार्यक्रमाला जातीयवाद्यांना निमंत्रित करणे म्हणजे जातीयवाद्यांचे हस्तक बनणे होय, अशी टीका आनंदराज यांनी केली. केंद्राने गॅस व डिझेल दरवाढीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते राज्यभरात आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला. तेल, वायू आणि कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण करावे, अशी मागणीही त्यांनी केली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS