राष्‍ट्रीय प्रतिकांचा अपमान करणाऱ्या व्यंगचित्रकाराला राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 September 2012

राष्‍ट्रीय प्रतिकांचा अपमान करणाऱ्या व्यंगचित्रकाराला राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक


राष्‍ट्रीय प्रतिकांचा अपमान करणाऱ्या व्यंगचित्रकाराला राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक 


मुंबई पोलिसांनी रविवारी व्‍यंगचित्रकार असिम त्रिवेदी यांना अटक केली आहे. असिम यांच्‍यावर आक्षेपार्ह व्‍यंगचित्र काढून राष्‍ट्रीय प्रतिकांचा अपमान केल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे. तसेच त्रिवेदी यांच्‍यावर वेब पोर्टलवर अश्‍लील व्‍यंगचित्रे प्रसिद्ध केल्‍याचा आरोपही ठेवण्‍यात आला आहे. पोलिसांनी त्‍यांचे वेब पोर्टल तत्‍काळ बंद केले आहे. मात्र फेसबुकवर अजूनही ते व्‍यंगचित्र उपलब्‍ध आहे. असिम यांच्‍यावर राजद्रोहाचा खटलाही दाखल करण्‍यात आला आहे. 

असिम यांच्‍यावर आयटी अ‍ॅक्‍ट आणि 1971 राष्‍ट्रीय प्रतिक अ‍ॅक्‍टचे उल्‍लंघन केल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे. असिम यांनी डिसेंबर 2011 मध्‍ये मुंबईच्‍या एमएमआरडीए मैदानावर इंडिया अग्‍नेस्‍ट करप्‍शनच्‍या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या रॅलीत सत्‍यमेव जयते ऐवजी भ्रष्‍टमेव जयते असे व्‍यंगचित्र काढून दाखवले होते, असे पोलिसांनी म्‍हटले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS