अनुदानित सिलिंडरची संख्या वाढणार? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 September 2012

अनुदानित सिलिंडरची संख्या वाढणार?

अनुदानित सिलिंडरची संख्या वाढणार?
नवी दिल्ली- प्रत्येक कुटुंबामागे अनुदानित सिलिंडरची संख्या सहावरून दहावर नेण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे घटकपक्ष असलेल्या तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि द्रमुक यांनी अनुदानित सिलिंडरची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिझेल दरवाढ अंशतः मागे घेणे आणि अनुदानित सिलिंडरची संख्या वाढविण्याला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांचा विरोध आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या अनुदानात कपात करावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. केरोसीन आणि पेट्रोलची सध्याच दरवाढ करण्यात येऊ नये, असे सरकारचे म्हणणे आहे. परंतु, घटक पक्षांनी प्रचंड दबाव टाकला असल्यामुळे अनुदानित सिलिंडरच्या संख्येत वाढ करण्यासंदर्भात विचार होऊ शकतो. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS