गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आता मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 September 2012

गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आता मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक

गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आता मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक 
मुंबई : भारतीय निवडणूक आयोगातर्फे मतदार यादी तसेच निवडणूक ओळखपत्राचे काम सतत सुरू असून या कामांसाठी नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांमधील सभासद निवडणूक अधिकार्‍यांना सहकार्य करीत नसल्याचे लक्षात आल्यामुळेच केंद्र शासनाच्या प्रस्तावानुसार नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकार्‍यांना मतदार केंद्रस्तरीय स्वयंसेवक (बूथ लेवल व्हॉलिंटिअर्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाच्या प्रस्तावानुसार, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 - अ अन्वये निबंधक, जिल्हा उपनिबंधक, उपनिबंधक, सहकारी गृहनिर्माण संस्था यांना संस्थांनी माहिती भरून दिल्याची खात्री करून घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या या निर्णयानुसार, गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांना निवडणुकीची काही कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. यानुसार गृहनिर्माण संस्थेमधील रहिवासी जे 18 वर्षाचे होतील, त्यांची नव्याने मतदार म्हणून नोंदणी करणे, सदस्य व रहिवासी जागा सोडून गेल्यास, सदस्यांचा/ रहिवाशांचा मृत्यू झाल्यास त्यांची नावे वगळणे याबाबतची सर्व माहिती आपल्या विभागातील मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे देणे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांच्या वार्षिक लेखा परीक्षणाच्या वेळी सादर करण्यात येणार्‍या अर्जदारांची माहिती 15 ऑगस्टपूर्वी किंवा 31 जुलैपूर्वी उपनिबंधक/ सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे पाठविणे अपेक्षित आहे.
     

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS