बॉम्बसदृश वस्तूने दहशत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 September 2012

बॉम्बसदृश वस्तूने दहशत



बॉम्बसदृश वस्तूने दहशत
मुंबई : ऑपेरा हाऊस, पंचरत्न या जवाहिर्‍यांच्या मार्केटजवळ शनिवारी बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ माजली. संपूर्ण झव्हेरी बाजार खाली करून बॉम्ब स्कॉड पथकाने त्या बॉम्बसदृश वस्तू निकामी केली. हा खोडसाळपणा गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गणेशोत्सव आला की, बॉम्ब ठेवल्याच्या अफवा, दहशतवादी शहरात दाखल झाल्याच्या वावडय़ा उठवल्या जाणार, अशाच प्रकारे गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ऑपेरा हाऊस पंचरत्न इमारतीतील जवाहिर्‍यांच्या मार्केटजवळ बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता एकच खळबळ माजली. संपूर्ण पंचरत्न इमारतसहित जवाहिर्‍यांचे मार्केट खाली करण्यात येऊन डी.बी. मार्ग पोलिसांनी बॉम्ब स्कॉडला पाचारण केले. बॉम्ब स्कॉडने घटनास्थळी दाखल होऊन दोन लाकडी पट्टय़ांना वायर बांधून त्याला पेन्सिल सेल लावलेली एक बॉक्स सदृश वस्तू निकामी करण्यात आली. हा खोडसाळपणा हिरे व्यापार्‍यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS