ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा देणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2012

ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा देणार


मुंबई : गेल्या काही वर्षात ज्येष्ठ नागरिक गुन्हेगारांचे सहज लक्ष्य होत आहे. यामुळे एकाकी राहणार्‍या ज्येष्ठ नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने त्यांच्या मनात पोलिसांबद्दलची आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दक्षिण मुंबईतील काही ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन सुरक्षेचे आश्वासन दिले. या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग हेही उपस्थित होते.

व्यावसायिक किंवा शैक्षणिक कारणास्तव पाल्य दूर राहत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक एकाकी राहतात. यामुळे त्यांच्या मनात एक प्रकारची पोकळी निर्माण होते. त्याचा फायदा काही समाजकंटक घेतात. त्या पाश्र्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी पोलीस दल पुढे सरसावले आहे. आर. आर. पाटील यांनी नागपाडा येथील शोएब ढोलकावाला आणि फोर्ट येथील सुरेंद्र रामय्यांच्या घरास भेट देत त्यांच्याशी खुल्यामनाने चर्चा केली. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जबाबदारी घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्यातून एकदा स्वत: भेटून संवाद साधाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी घरगडय़ांची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी, याशिवाय आपली वैयक्तिक माहिती उपलब्ध करून पोलीस दलास सहकार्य करावे, अशी सूचना आर. आर. पाटील यांनी केली. ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित चोरी आणि इतर किरकोळ खटले निकालात काढण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था विभागाशी चर्चा करण्यात येणार आहे. पोलीस ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवणसाठी प्रयत्नशील आहेत की नाही हे तपासण्यासाठी महिन्यातून एकदा ज्येष्ठ नागरिकांची भेट घेणार असल्याचे आर. आर. पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS