महार वतन इनामी जमिनीसाठी धरणे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2012

महार वतन इनामी जमिनीसाठी धरणे आंदोलन


मुंबई : महार वतन इनामी जमिनीच्या प्रकरणामध्ये झालेल्या मनमानी कारभाराबाबत हा समाज पेटून उठला पाहिजे. अन्यायाला वाचा फुटली पाहिजे. यासाठी रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)च्या वतीने 3 ऑक्टोबर रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलन होत असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव वाघमारे यांनी सोमवारी दिली. गैरहस्तांतरण झालेल्या इनामी जमिनी संबंधित गैरहस्तांतरण रद्द करण्याचा कायदा करून सर्व जमिनी मूळ वतनदारांस परत करण्यात याव्यात. आदिवासी जमिनीसंबंधी केलेल्या कायद्याप्रमाणे महार वतन इनामी जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार झाल्यास बंदी घालावी. महार वतन इनामी जमिनीत झालेल्या अतिक्रमण प्रकरणात अँट्रोसिटी कायद्यान्वये कारवाई करावी. वतनी जमिनीच्या प्रकरणात झालेल्या मुदत अधिनियम 1983 शिथिल करण्यात यावा. शासन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या प्रकरणांत बाधित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे. गहाण व्यवहार प्रकरणात कर्जमुक्ती कायद्यान्वये कर्जमाफी घेऊन जमीन परत मिळावी यासाठी हे आंदोलन होत असल्याचे सयाजीराव वाघमारे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS