कोकण रेल्वेवर 8 हिवाळी विशेष एक्‍स्प्रेस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 October 2012

कोकण रेल्वेवर 8 हिवाळी विशेष एक्‍स्प्रेस


मुंबई - कोकण रेल्वे मार्गावरून हजरत निजामुद्दीन-मडगाव स्थानकांदरम्यान 8 वातानुकूलित हिवाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सुट्टीत कोकण, गोवा आणि उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. 

उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे यांच्या सहकार्यातून हजरत निजामुद्दीन-मडगाव स्थानकांदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. ही विशेष एक्‍स्प्रेस हजरत निजामुद्दीन येथून 3, 10, 17, 24 नोव्हेंबरला सकाळी 7.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 वाजता मडगावला पोहोचेल. त्याचप्रमाणे मडगावहून 5, 12, 19 आणि 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.25 वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7.20 वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल.
-- 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS