मुंबई : महानगरपालिकेद्वारे वेरावळी टेकडी जलशयामधून पाणी पुरवठा करणार्या 1200 मि.मी. व्यासाच्या वर्सोवा बहिर्गामी जलवाहिनीवर कनोसा हायस्कूलजवळ, महाकाली गुंफा रोड, अंधेरी (पूर्व) येथे गळती बंद करण्याचे काम बुधवार, 3 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. गुरुवार, 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. यादरम्यान के-पश्चिम विभाग, अंधेरी (प.) मधील काही विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात एस. व्ही. रोड, जे. पी. रोड, नवरंग सिनेमा परिसर, सीझर रोड आंबोली, म्हातारपाडा, केवणीपाडा, आंबोली, गीलबर्ट हिल, वीरा देसाई रोड, आझादनगर, गावदेवी, डोंगरी या विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर डी. एन. नगर, चार बंगला, सात बंगला, जुहू-वर्सोवा लिंक रोड, मॉडेल टाऊन (अंशत:), एसिक नगर, इंडियन ऑईल कंपनी या भागातील पाणीपुरवठय़ामध्ये 25 टक्के कपात असणार आहे.
Post Top Ad
02 October 2012
Home
Unlabelled
गुरुवारी अंधेरीतील पाणीपुरवठय़ावर परिणाम
गुरुवारी अंधेरीतील पाणीपुरवठय़ावर परिणाम
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment