ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबई पालिकेचे प्रस्तावित धोरण जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2012

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबई पालिकेचे प्रस्तावित धोरण जाहीर


मुंबई : मुंबई महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांसाठीचे प्रस्तावित धोरण जाहीर केले. या धोरणासाठी 2013-14 च्या अर्थसंकल्पात आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बोरिवली येथील प्रबोधनकार नाटय़गृहात ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी महापौर सुनील प्रभू, उपमहापौर मोहन मिठबावकर आणि ज्येष्ठ नागरिक धोरणासाठी सतत पाठपुरावा करणारे नगरसेवक विनोद शेलार उपस्थित होते.

2011च्या जनगणनेनुसार 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची मुंबईतच संख्या 12 लाख आहे. यातील 21 टक्के ज्येष्ठ नागरिक म्हणजे 2.5 लाख दारिद्रय़रेषेखाली राहणारे आहेत. ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करताना काही उद्दिष्टय़े समोर ठेवण्यात आली होती. यात ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काकरिता विविध कल्याणकारी योजना राबविणे, सुविधा पुरविणे, सुरक्षेकरिता उपाययोजना करणे याशिवाय सन्मानपूर्वक जगण्यासाठी मदत करणे, अशी उद्दिष्टय़े ठेवण्यात आली होती. त्याअनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी 500चौ. फुटांचे विरंगुळा केंद्र उभारणे, उपक्रमाचे आयोजन करणे, स्वच्छतागृहात रॅम्प आणि रेलिंगजची व्यवस्था करणे आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या धोरणानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत आयुक्त/अतिरिक्त आयुक्त/संबंधित संलग्न खात्याचे अधिकारी आणि फेस्कॉमच्या पदाधिकार्‍यांचा समावेश असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी हे उद्यान विशिष्ट कालावधीत उपलब्ध होणार आहे. प्रमुख रुग्णालयात वैद्यकीय उपचार आणि तपासणीसाठी मार्गदर्शन मिळेल

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS