मुंबईत सातव्या सिलिंडरसाठी मोजावे लागणार 914 रुपये - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2012

मुंबईत सातव्या सिलिंडरसाठी मोजावे लागणार 914 रुपये


मुंबई: केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरची मर्यादा घालून दिल्यानंतर तेल कंपन्यांनी विनाअनुदानित मिळणार्‍या सिलिंडरचे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार मुंबईत विनाअनुदानित सिलिंडरसाठी तब्बल 914 रुपये मोजावे लागणार आहेत. 
एका कुटूंबासाठी एका वर्षात सहा सिलिंडर सवलतीत मिळणार आहे, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यानंतर आता तेल कंपन्यांनी विनाअनुदानित सिलिंडरचे दर जाहीर केले. त्यामुळे सातवा सिलिंडर खरेदी करताना प्रत्येक कुटूंबात गॅसचा भडका उडणार स्फोट होणार आहे. अर्थात दुप्पट रूपये देऊन सातवा सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे. 
त्यात ज्या राज्यात कॉंग्रेसचे सरकार आहे, अशा राज्यांमध्ये नऊ सिलिंडर मिळणार असल्याचे गेल्या आठवड्यात कॉंग्रेस पक्षाने जाहीर केले होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये कमालीची साशंकता निर्माण झाली आहे. 
पहिल्या सहा सिलिंडरवर सरकारचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे एक ते सहा सिलिंडर प्रत्येकी 423 रूपयांना मिळणार आहे. सातव्या सिलिंडरसाठी 914 रूपये ग्राहकांना मोजावे लागतील.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS