स्कूल बस चालकाला ट्रक चालकाकडून मारहाण ..... - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 October 2012

स्कूल बस चालकाला ट्रक चालकाकडून मारहाण .....


मुंबई / गोवंडी / रशीद इनामदार
दि. २/१०/२०१२ रोजी गोवंडी येथील पी.एल.लोखंडे मार्ग ,वीरमाता जिजाबाई भोसले मार्ग तसेच देवनार पशुवध गृहाकडे जाणाऱ्या मार्गांच्या के.डी जंक्शन या चौकात .साई डी कोलार या स्कूल बस चालकाला अनोळखी ट्रक चालकाने शिवीगाळ करत मारहाण केली . त्यामध्ये स्कूल बस चालकाच्या डाव्या कानाला अंतर्गत गंभीर इजा झाली.
  शाळेला सुट्टी असल्यामुळे चालक एम एच -०३ ए एच ९६६३ या बस चे दाग्दुजीचे काम आटोपून परतत असताना के.डी.जंक्शन जवळील रस्त्यावरून यु पी ७८ बी एल ४९३१ हा ट्रक अचानक समोर आला व त्याने स्कूल बस ला समोरच्या बाजूस धडक दिली . स्कूल बस चालकाने ज्या स्थितीत अपघात झाला त्याच स्थितीत वाहन उभे ठेवून ट्रक चालकालास वाहन अचानक का बाहेर आणलेस मुख्य रस्त्याचा अंदाज घेतल्याशिवाय कसे वाहन मुख्य रस्त्यवर आणलेस  ? अशी विचारणा केली असता ट्रक चालकाने स्कूल बस चालका ला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली . स्कूल बस चालकाने मालक शंकर ठाकूर यांना संपर्क सांगून झालेलं प्रकार सांगितला . त्यानुसार चालक आणि मालक देवनार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता ट्रक चालकाने ट्रक घेऊन तेथून पोबारा केला.
      शताब्दी रुग्णालयात स्कूल बस चालकाची वैद्यकीय तपासणी केली असता . त्याच्या कानाला अंतर्गत गंभीर इजा झाल्याचे निष्पन्न झाले.त्या नुसार अनोळखी ट्रक चालकाविरुद्ध भा द वी कायद्यानुसार कलम ३२३ व ५०४ नुसार अदखलपात्र फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पो.उप.निरीक्षक भारमळ यांनी हि तक्रार दाखल करून घेतली .

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS