संयम राखावा : उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 November 2012

संयम राखावा : उद्धव ठाकरे


Photo: ठाकरेंची प्रकृती नाजूक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती नाजूक झाली असून बाळासाहेबांवर `मातोश्री`वर उपचार सुरु आहेत. राज ठाकरे आपल्या परिवारासह मातोश्रीवर उपस्थित झाले आहेत. तसेच शिवसैनिकही मातोश्रीबाहेर जमले आहेत. 

बाळासाहेबांच्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता असल्याने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी मातोश्रीवर पोहचले आहेत. त्यामुळे मातोश्री बाहेर पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.

राज ठाकरे हे दोघंही मातोश्रीवर उपस्थित आहेत. बुधवारी रात्री उशीरा राहुल शेवाळे, रविंद्र वायकर, सुभाष देसाई हेही मातोश्रीवर दाखल झाले होते. शिवसेनेचे इतर महत्त्वाचे नेतेही मातोश्रीवर दाखल झाले आहे.

बाळासाहेबांवर उपचार सुरू असून आम्ही आशा सोडलेली नाही, तुम्हीही संयम सोडू नका. त्यांची इच्छाशक्ती दांडगी असून त्या बळावर आपण या संकटातून तरून जावू, असे भावनिक आवाहन शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

बुध
वारी रात्री उशिरा बाळासाहेबांची प्रकृती गंभीर झाल्याचे वृत्त कळताच हजारो शिवसैनिकांसह त्यांच्या चाहत्यांनी मातोश्रीकडे धाव घेतली. तासा-दीड तासातच ही गर्दी एवढी वाढली की वाहतुकीचे मार्ग बदलावे लागले. अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था मागविण्यात आली.

गर्दीमध्येच अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, संजय दत्त यांच्यासह अनेक राजकीय नेते मातोश्रीवर पोहचले. मातोश्रीसमोरची ही गर्दी बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आली होती. अखेर मध्यरात्री दोनच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

उद्धव म्हणाले की, ' आम्ही आशा सोडली नसून तुम्हीही आशा सोडू नका. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. बाळासाहेबांची इच्छाशक्ती दांडगी असून ते या संकटावर मात करतील. सर्वांनी शांतता आणि संयम बाळगावा.'

गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेबांना श्वसनाचा त्रास होतोय. गेल्या शुक्रवारपासून तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत , तसंच ठाकरे कुटुंबातील सदस्यही ' मातोश्री ' वरच उपस्थित आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही मातोश्रीवरच आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS