| मुंबई : पालिकेकडून कर्ज घेताना बेस्ट समितीत व्याजाच्या दराबाबत दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याचा आरोप करत मंगळवारी काँग्रेस सदस्य रवीराजा यांनी बेस्ट समिती सभा तहकूब करण्याची मागणी केली. मात्र यावर बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी योग्य स्पष्टीकरणानंतर बेस्ट अध्यक्ष अशोक पाटील यांनी या सूचनेवर मतदान घेत रवीराजा यांची तहकुबी सूचना फेटाळून लावली. रवीराजा यांनी यापूर्वी पालिकेने घेतलेल्या व्याजापेक्षा कमी व्याजानेही आपण कर्ज घेतल्याचे प्रशासनाकडून सांगितले गेले नाही, यामुळे आमची दिशाभूल झाल्याचा आरोप त्यांनी केला. यावर भाजपा गटनेते दिलीप पटेल यांनी रवीराजांचा मुद्दा खोडत राज्य शासनाने पालिकेला व्याज घेऊ नये, असे निर्देश द्यावेत, असा टोला दिला. सुहास सामंत यांनीही पालिकेने आपले काम केले आता तुमचे शासन काय करणार, असे विचारत रवीराजा यांना धारेवर धरले. यावर महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी जुलै महिन्यापासून कोणत्याही बँकेकडून बेस्टला कर्ज मिळत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळेच पालिका 12 टक्के व्याजाने कर्ज देण्यास तयार झाल्यावर आपण सहमती दर्शवली, असे गुप्ता यांनी सांगितले. यापूर्वीही वेळोवेळी आपण योग्य माहिती समितीसमोर ठेवली होती, मात्र सोयीपुरतेच ऐकले जाते व तेच मांडले जाते, अशी व्यथा त्यांनी मांडली |
Post Top Ad
07 November 2012
Home
Unlabelled
काँग्रेसची बेस्ट समिती सभा तहकुबीची मागणी फेटाळली
काँग्रेसची बेस्ट समिती सभा तहकुबीची मागणी फेटाळली
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment