मुंबई : दादर ते आझाद मैदान अशी रॅली काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे राज्यभरातून थेट आझाद मैदानात अंगणवाडी महिलांचे आंदोलन होणार आहे. दरम्यान, मंगळवारी 19 महिलांनी उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांच्याबरोबर मंगला सराफ, लीला पवार, सरला जी. आर., सुनीता बाबर, राजश्री बोडके, संगीता ठाकरे, मंगला मिस्त्री, आशालता पाटील, आशा गांधी, मीना यशवंते, रश्मी ढगे आदी महिलांनी उपोषण सुरू केले आहे. राज्यभरातून 15 ते 20 हजार महिला बुधवारच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत, असे बृजपाल सिंह यांनी सांगितले. महागाई भत्ता, बोनस, भाऊबीज भेट, शासकीय सेवेत कायम करणे, वार्षिक वेतनवाढ, ग्राम बालविकास योजनेतील कामासाठी ताशी 35 रुपये द्यावे, 1 तारखेला मानधन मिळावे, गणवेषाचा प्रश्न, रजा, निवृत्ती लाभ, आरोग्याचा प्रश्न, आजारपणाची रजा, एक महिन्यांची उन्हाळी सुट्टी, सुसज्ज अंगणवाडी, टीएचआर आदी मागण्यांबाबत सरकारने निर्णय घ्यावा, असे सिंह यांनी या वेळी सांगितले.
Post Top Ad
07 November 2012
Home
Unlabelled
अंगणवाडी महिलांचे उपोषण सुरू
अंगणवाडी महिलांचे उपोषण सुरू
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment