शिवसेनेत आता फक्त उपनेतेपदच
बाळासाहेबांच्या निधनानंतर संघटनेत कोणतीही फूट पडून नये व संघटना एकसंध राहण्यासाठी उद्धव यांच्यासमवेत सेनेतील अनेक नेते आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत; पण असे असतानाही मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे शिवसेनेत फूट पाडण्याचे प्रयत्न जोर धरू लागल्यानेच उद्धव यांनी घाईघाईने आपला राज्यव्यापारी दौर्याचे आयोजन केले.
शिवसेना नेते व कार्यकर्त्यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भेटीगाठी वाढल्याने सेनेत काळजीचे वातावरण पसरले आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाने शोक व्यक्त करणार्या बडय़ा जाहिराती अनेक प्रसारमाध्यमांत दिल्या होत्या. त्यामागे शिवसैनिकांची सहानुभूती संपादन करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या राजकीय वतरुळात सुरू आहे. सेनाप्रमुखांनंतर शिवसेना खिळखिळी होईल, असा अंदाज अनेक नेत्यांचा आहे.
याबाबत मुंबईसह राज्यभरातील सर्व जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुखांची तसेच विभागप्रमुखांची एक महत्त्वाची बैठक डिसेंबरच्या मध्याला सेनाभवन येथे आयोजित केली जाणार आहे. त्यातच उद्धव यांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे सूत्राने सांगितले. यापुढे शिवसेनेत फक्त उपनेतेपदच ठेवले जाणार असल्याने दुसर्या व तिसर्या क्रमांकाचे पद नसणार असे कळते.
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबतचा निर्णयही सर्वाच्या मताने व साक्षीने याच बैठकीत घेतला जाणार असल्याचे कळते. बाळासाहेबांचे भव्य स्मारक मुंबईत उभारण्यासाठी सर्व नेत्यांचे व सैनिकांचे मत घेतले जाणार आहे. एकमतानेच कुठलाही वाद अथवा कोणाच्याही भावना न दुखावता घेतला जाणार असल्याचे कळते.
राज्यभरात ठिकठिकाणी दौरे करून ते सामान्य शिवसैनिकांशी थेट संवाद साधणार आहेत. 3 डिसेंबरला कोल्हापूर येथून या दौर्याला ते सुरुवात करणार आहेत. शाहू महाराज सांस्कृतिक केंद्रात पदाधिकारी मेळाव्याने त्यांचा दौरा सुरू होणार आहे. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी नाशिक, तर 7 डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे ते मेळाव्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 16 डिसेंबरला औरंगाबादमध्ये जाहीर सभाही घेणार आहेत. भविष्यातील राजकीय गणितांबद्दल शिवसैनिकांचा कल जाणून घेण्यासाठीच हा दौरा उद्धव ठाकरे करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. तसेच त्यांचा हा दौरा पक्षासाठी आणि त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
Post Top Ad
01 December 2012
Home
Unlabelled
शिवसेनेत फुट पडू नये म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौर्यावर
शिवसेनेत फुट पडू नये म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौर्यावर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment