'फेसबुक' की 'फेकबुक'? मनसेकडून चौकशीची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 December 2012

'फेसबुक' की 'फेकबुक'? मनसेकडून चौकशीची मागणी

मुंबई : 'फेसबुक' प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असतानाच मनसेने शुक्रवारी 'ते फेसबुक आहे की फेकबुक ?' असा सवाल एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला. कुणीही उठते आणि कुणाच्याही नावाने काहीही लिहिते, या प्रकारांची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशीच्या नावाने फेसबुकवर कुणी तरी अकाऊंट्स काढले आहे, त्यावर काहीही लिहिले जात आहे. त्याचबरोबर राज ठाकरेंचा मुलगा अमितच्या नावानेही कुणीतरी ट्विटरवर अत्यंत चुकीचा मजकूर लिहून 'टिवटिव' सुरू ठेवली आहे. याप्रकरणी पोलीस व त्यांच्या संगणकीय गुन्हे अन्वेषण (सायबर क्राइम) विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केल्याचे मनसेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. राज ठाकरेंच्या नावानेही फेसबुक व ट्विटरवर बरीच अकाऊंट्स असून त्या अकाऊंटशी ठाकरे कुटुंबीयांचा कुठलाही संबंध नाही. बनावट अकाऊंट्समधील मजकुरावर जनतेने विश्वास न ठेवण्याचे आवाहन मनसेने केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS