बेकायदा मोबाईल टॉवर उभारणाऱ्या कंपन्यांना चाप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 November 2012

बेकायदा मोबाईल टॉवर उभारणाऱ्या कंपन्यांना चाप


मुंबई- मुंबईतील सोसायट्यांवर मोठ्या प्रमाणात बेकायदा मोबाईल टॉवर उभारले आहेत. अशा पद्धतीने मोबाईल टॉवर उभारणाऱ्या सोसायट्या आणि कंपन्यांच्या विरोधात नगरनियोजन कायद्याअंतर्गत (एमआरटीपी) कारवाईचा इशारा पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिला आहे. मुंबईत एक हजार 800 टॉवर बेकायदा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दिवाळीनिमित्त पालिका आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईत तीन हजार 600 मोबाईल टॉवर आहेत. त्यापैकी एक हजार 800 टॉवर बेकायदा असल्याचे आढळून आले आहे. त्यातील 250 टॉवरविरोधात कारवाई करण्यात आली असून ही प्रकरणे न्यायप्रविष्ट ठरली आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पालिका या टॉवरप्रकरणी नवी नियमावली तयार करणार आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने गेल्या 1 सप्टेंबरला मोबाईल टॉवरबाबत अधिसूचना काढली असून मोबाईल टॉवर उभारण्याबाबत नियम घालून दिले आहेत. ते नियम स्वीकारले जातील; तसेच त्यानुसार पालिका नवी नियमावली तयार करील, असेही आयुक्त कुंटे यांनी स्पष्ट केले.

मोबाईल टॉवर उभारण्यासाठी परवानगी दिली आहे काय, याची पडताळणी केली जाईल. टॉवरच्या उपकरणातून किरणोत्सर्ग जास्त होत असेल, तर सोसायटीने कंपनीकडे तक्रार करावी आणि या तक्रारींची दखल घेण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करावा, अशी सूचना पालिका आयुक्त कुंटे यांनी केली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS