शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तब्येतीविषयी जाणून घेण्यासाठी, त्यांची विचारपूस करण्यासाठी ' मातोश्री ' वर विविध क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागली असली, तरी त्यांच्यापैकी कुणालाच बाळासाहेबांना प्रत्यक्ष पाहता येत नाहीए. मातोश्री बंगल्यातील दुस-या मजल्यावर बाळासाहेबांवर उपचार सुरू असून तिथे फक्त ठाकरे कुटुंबीयांनाच प्रवेश दिला जातोय.
बाळासाहेबांची तब्येत खालावल्यानंतर शिवसेना नेत्यांसह राजकारण, समाजकारण, उद्योग, कला, चित्रपट क्षेत्रातील अनेक बड्या व्यक्तींनी ' मातोश्री ' ला भेट दिली. मात्र त्यांच्यापैकी कुणालाच बाळासाहेबांपर्यंत पोहोचता आलं नसल्याचं अधिकृत सूत्रांकडून समजतं. राज्यपाल के. शंकरनारायण, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनाच फक्त त्यांच्या खोलीत प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्याशिवाय, अन्य दिग्गज नेतेमंडळींनी तळमजल्यावरच उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, राज यांच्याकडून बाळासाहेबांच्या तब्येतीविषयी जाणून घेतलं.
ठाकरे कुटुंबीयांशिवाय कुणालाही वरच्या मजल्यावर, बाळासाहेबांच्या खोलीत पाठवण्यास डॉक्टरांनीच मज्जाव केला आहे. बाळासाहेबांना कुठलंही इन्फेक्शन होऊ नये, यादृष्टीनं डॉक्टरांनी ही खबरदारी घेतली आहे. त्यामुळे उद्धव, राज, आदित्य यांची ठरावीक काळानं वर-खाली ये-जा सुरू आहे. शिवसेना नेते, पदाधिका-यांसह काही मनसैनिकही ' मातोश्री ' च्या तळमजल्यावर तळ ठोकून
आहेत. आपल्या नेत्याकडून ते बाळासाहेबांच्या तब्येतीबाबत वेळोवेळी माहिती घेत आहेत.
Post Top Ad
JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात
महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा.
डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads
Sponsored Content
Business Promotions
Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates
Breaking & Latest News Feed
Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.
Subscribe Latest News17 November 2012
Home
Unlabelled
बाळासाहेबांच्या खोलीत 'नो एन्ट्री'
बाळासाहेबांच्या खोलीत 'नो एन्ट्री'
Subscribe to:
Post Comments (Atom)
Live Updates
Breaking & Latest News Feed
Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.
Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!
तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.
WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment