रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर "मेगाहाल' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2012

रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर "मेगाहाल'

मुंबई - रेल्वेमार्गांच्या डागडुजीसाठी मध्य, हार्बर रेल्वेवर रविवारी (ता.18) सकाळी 11 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत "मेगाब्लॉक' घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे "मेगाहाल' होण्याची शक्‍यता आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण - ठाणे अप स्लो मार्गावर दुरुस्तीचे काम होणार आहे. त्यामुळे अप स्लो व सेमी फास्ट मार्गावरील लोकल कल्याण - मुलुंड स्थानकांदरम्यान सकाळी 10.56 ते दुपारी 3.11 वाजेपर्यंत अप फास्ट मार्गावरून चालविण्यात येतील. या काळात अप लोकल ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा या स्थानकांवर थांबणार नाहीत.

हार्बर मार्गावर कुर्ला - छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) आणि वडाळा रोड - माहीम स्थानकांदरम्यान सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे सीएसटी -वांद्रे, सीएसटी-अंधेरी दरम्यानची वाहतूक दुपारी 3.45 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील.

मेगाब्लॉकमुळे पनवेल - सीएसटी अप मार्गावरील लोकल सकाळी 10.43 ते दुपारी 3.23 वाजेपर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून कुर्ला -सीएसटी स्थानकांदरम्यान धावतील. या लोकल करी रोड व चिंचपोकळी स्थानकांवर थांबणार नाहीत. सीएसटी - अंधेरी मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पश्‍चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे.

पश्‍चिम रेल्वेवर "जम्बोब्लॉक'
पश्‍चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 ते सायंकाळी 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर जम्बोब्लॉक असेल. या काळात अप व डाऊन स्लो मार्गावरील लोकल गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान फास्ट मार्गावरून चालविण्यात येतील. बोरिवली स्थानकातील 3, 4, 5, 6, 6ए या फलाटांवरील वाहतूक बंद राहील. ब्लॉकमुळे अनेक लोकल रद्द करण्यात आल्या
आहेत, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS