| मुंबई : मुंबईतील वरळी कोळीवाडय़ाच्या समुद्रकिनारी मोठय़ा प्रमाणात रॅबिट तसेच गाळ जमा झाल्याने परिसरात दुर्गधी पसरली आहे. यामुळे स्थानिक नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी शुक्रवारी याबाबत महापौर सुरेश प्रभू यांच्या समोर आपली व्यथा मांडली. असता या चोपाटीच्या सफाई साठी गाढवांचा वापर करावा असे आदेश महापौर सुनील प्रभू यांनी दिले. यावर हा गाळा तसेच रॅबिट साफ करण्यासाठी जेसीबी वापरणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य नसल्याने या ठिकाणी गाढवांच्या मदतीने साफसफाई करण्यात यावी, असे आदेश महापौरांनी संबंधित अधिकार्यांना दिले.वरळी कोळीवाडय़ाची नैसर्गिकदृष्टय़ा रचना पाहता तेथे कचरा उचलण्यासाठी जेसीबी वापरणे शक्य होत नसल्याने या ठिकाणी सात-आठ महिन्यांपासून दुर्गधी पसरली आहे. याबाबत नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी जी/ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांच्याकडे तक्रार केली. त्यावर हे काम आमचे नसून कचरा व्यवस्थापन विभागाचे असल्याने त्यांच्याकडे तक्रार करा, असे सांगण्यात आले. त्यानंतर वरळीकर यांनी घनकचरा विभागाकडे तक्रार केली असता या कामासाठी निविदा काढाव्या लागतील. त्याला वेळ लागेल, असे उत्तर देण्यात आले. शेवटी वरळीकर यांनी आपली कैफियत महापौरांच्या समोर मंडळी, महापौरांनी सहाय्यक आयुक्त तसेच घनकचरा व्यवस्थापन अधिकक्ष यांची संयुक्त बैठक घेतली. त्या वेळी या ठिकाणी जाण्यासाठी जागा नसल्याचे महापौरांना सांगण्यात आले. तेव्हा महापौरांनी गाढवांचा वापर करून वरळी कोळीवाडय़ाचा समुद्रकिनारा साफ करावा, असे आदेश दिले. |
Post Top Ad
01 December 2012
Home
Unlabelled
गाढव करणार वरळी कोळीवाडा चौपाटीची सफाई
गाढव करणार वरळी कोळीवाडा चौपाटीची सफाई
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment