मुंबई : उपनगरी रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी जास्त वेळ रांगेत उभे रहावे लागू नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांवर सीव्हीएम कुपन्स आणि एटीव्हीएम मशिन्स बसवल्या आहेत, परंतु सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकांमध्ये लावण्यात आलेल्या ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स हँग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त होत आहेत.
मध्य रेल्वेच्या मार्गावर सीएसटी ते कसारा-कल्याण-पनवेलदरम्यान 246, तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान एकूण 115 एटीव्हीएम मशिन्स आहेत. उन्हामुळे या मशिन्स हँग होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात येते. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान एकूण 115 एटीव्हीएम मशिन्स आहेत, तर मध्य रेल्वेवर पूर्वीच्या 170 आणि नुकत्याच लावलेल्या नवीन 76 अशा तब्बल 246 ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स लावण्यात आल्या आहेत. त्यापैकी पूर्वीच्या 170 यंत्रांसाठी रिफिलिंगची सुविधा आहे, तर नव्याने लावलेल्या यंत्रांसाठी ही सुविधा देण्याचे काम सुरू आहे. परंतु सध्या उन्हाच्या तडाख्यामुळे या यंत्रातील 18 ते 25 यंत्रे हँग होऊ लागली आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या यंत्रांमध्ये थंडावा देण्यासाठी विशिष्ट रचनेतील पंखे बसविण्यात येणार आहेत. एटीव्हीएमच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या तिकिटांमुळे एकूण उत्पन्नाच्या 10 टक्केउत्पन्न मध्य रेल्वेला, तर 8 टक्के उत्पन्न पश्चिम रेल्वेला मिळते. त्यामुळे या मशिन्समधील बिघाड लवकरात लवकर दूर करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
Post Top Ad
01 December 2012
Home
Unlabelled
एटीव्हीएम मशिन्स हँग होण्याच्या घटनांमध्ये वाढ
एटीव्हीएम मशिन्स हँग होण्याच्या घटनांमध्ये वाढ
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment