गृहनिर्माण संचालक मंडळाच्या निवडणुकीत नियमांची पायमल्ली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 November 2012

गृहनिर्माण संचालक मंडळाच्या निवडणुकीत नियमांची पायमल्ली

मुंबई : मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण संघ मर्यादितने सहकार वर्ष 2012-13 ते 2016-17 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम केवळ कार्यालयातील नोटीस बोर्डवर तसेच नोव्हेंबर 2012 रोजीच्या 'हौसिंग टाइम्स' मासिकात प्रसिद्ध केला आहे. ही निवडणूक मुंबईतील हजारो गृहनिर्माण संस्थांशी निगडित असल्याने निवडणुकीचा कार्यक्रम वृत्तपत्रात प्रसिद्ध होणे अपेक्षित होते, यामुळे निवडणूक कार्यक्रमात पारदर्शकता आली असती अशी टीका महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनकडून करण्यात आली आहे. ही निवडणूक 16 फेब्रुवारी 2013 रोजी घेण्यात येणार आहे. मुंबईमध्ये एकूण 18 हजार गृहनिर्माण संस्था असून त्यात सुमारे 30 लाख सदनिकाधारक राहत आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS