| मुंबई : जागतिक अहवालानुसार सध्या 33.4 दशलक्ष लोक सध्या एचआयव्ही/ एड्सने बाधित आहेत. भारतात ही संख्या 1.4 ते 2 टक्के एवढी आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी मेडस्केप इंडिया असोसिएशन 'एचआयव्ही गो अवे फ्रॉम ग्लोब' या शीर्षकाखाली 1 डिसेंबर रोजी रॅलीचे आयोजन केले आहे. विकसित देशांप्रमाणे भारतात वैज्ञानिक प्रयोगशाळा, संशोधन सुविधा, साधने आणि एड्सशी लढण्यासाठी पुरेसे डॉक्टर्सर्ही नाहीत. याशिवाय लैंगिक गोष्टींवर चर्चा करण्यास असलेली अघोषित बंदी, स्थानिक आरोग्य अधिकारी आणि त्यांचे समुदाय यांच्यामधील असमन्वय, मोठय़ा प्रमाणावर पसरलेली गरीबी आणि कुपोषण, तसेच रक्त तपासून ते साठवून ठेवण्याच्या क्षमतेचा अभाव अशा गोष्टींमुळे सरकारला एड्सवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. मेडस्केप इंडियाने पुढाकार घेऊन शहरातील तसेच देशातील सर्व वर्गामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मेडस्केप इंडिया असोसिएशनने वैज्ञानिक समुदायासोबत एकत्र येऊन तसेच अनेक डॉक्टरांच्या सहकार्याने एक रॅलीचे आयोजन केले असून त्याचे शीर्षक एचआयव्ही 'गो अवे फ्रॉम ग्लोब' असे आहे. ही रॅली 1 डिसेंबर 2012 रोजी (जागतिक एड्स दिन) जुहू चौपाटीवर आयोजित केली जाणार आहे. या मोहिमेत राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी सहभागी होणार असून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. एड्स जागृती रॅली जुहू चौपाटीवरील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून सुरू होईल आणि ती टय़ूलिप इंटरनॅशनल हॉटेलपासून पुढे जाऊन लायन्स क्लब ऑफ इंडिया गार्डनवरून पुढे जाईल आणि विद्यानिधी हायस्कूल, जुहू येथे हा रॅली संपेल. |
Post Top Ad
29 November 2012
Home
Unlabelled
एड्स दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
एड्स दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment