पालिकेतील स्वार्थी पत्रकार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 November 2012

पालिकेतील स्वार्थी पत्रकार

मुंबई महानगर पालिकेमध्ये वृत्तसंकलन करताना पालिकेमध्ये वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांचा जवळून अनुभव घेता आला. जवळ पास दीड वर्ष वृत्तसंकलन करताना पालिकेमध्ये काही पत्रकार आम्ही नामांकित पेपरचे पत्रकार आहोत अशी गुर्मी बाळगताना दिसले. पत्रकारांनी इतरांबरोबर मित्रासारखे वागावे असे बोलले जाते परंतु पालीकेमध्ये मात्र काही हातावर मोजता एतील असे पत्रकार इतर पत्रकारांना तुम्ही छोट्या पेपरचे पत्रकार आहात असे सांगून हिनवणूक करत असतात. 

अशाच नामांकित पेपरचे पत्रकार आहोत असे म्हणवणाऱ्या पत्रकारांनी एकत्र एवून पालिकेमध्ये वार्ताहर संघ स्थापन केला आहे. या वार्ताहर संघाचा कारभार इतका बेजबाबदार पणे चालू असतो कि सर्वसामान्य पत्रकारांना पालिकेकडून काही सुविधा मिळतात याची माहिती सुधा देण्याचे टाळले जाते. हातावर मोजता एतील अश्या पत्रकारांकडून ठराविक पालिकेमधील पादाधिकारी आणि अधिकारी यांना भेटून फक्त आम्हाला म्हणजेच कमिटीवर असलेल्या पत्रकारांना काहीही द्या परंतु इतर पत्रकारांना काहीही देवू नका असे सांगितले जाते.

पालीकेमधील वार्ताहर संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली म्हणण्या पेक्षा सेटिंग करून कमिटी बनवण्यात आली. पालीकेमध्ये वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांना सभासद न करता, सभासदांची यादी प्रसिद्ध न करताच,  जमा खर्चाचा अहवाल सादर न करताच निवडणूक घोषित करण्यात आली. निवडणुकी आधी एका बंद खोलीमध्ये बसून तू हे पद घे मी हे पद घेतो असे सांगत कार्यकारिणी घोषित करण्यात आली. 

या वार्ताहर संघाचे सभासद कोण तर जे पालिकेमध्ये वूत्तासंकलनच करत नाहीत. कित्तेक पत्रकारांनी पालिकेमध्ये येण्याचे सोडले आहे. अश्या सभासदांच्या नावावर कमिटीमध्ये असलेले १० टक्के पत्रकार मजा मारत आहेत. या कमिटीचे किस्से हि खूप मजेदार आहेत पालिकेने क्रिकेटची म्याच आयोजित केली होती हि म्याच प्रशासन, पदाधिकारी व पत्रकारांमध्ये होणार होती. परंतु अशी म्याच आयोजित केली असल्याचे पत्रकारांपासून लपवून कमिटी मधील पत्रकार स्वत्ताच म्याच खेळून आले. सदर म्याच संपल्यावर ३ हजार रुपयांचे बूट आणि कपडे मिळणार होते म्हणून ज्यांना धावताही येत नव्हते त्यांची नवे क्रिकेट खेळण्यासाठी दिली असल्याचे समजते.विशेष म्हणजे ज्या पत्रकारांनी बूट आणि कपड्यांसाठी पैसे घेतले त्यापैकी कित्येक पत्रकारांना मागील वर्षी म्याच झाली नसतानाही पैसे बूट आणि कपड्यांसाठी पैसे दिल्याचे समजते.

पत्रकारांना काही मिळणार आहे असे समजले कि काही कमिटी मधील लोक जाऊन ती सुविधा किवा वस्तू इतर पत्रकारांना कशी मिळणार नाही यासाठी प्रयत्न करत असतात. या पत्रकारांना पालिकेमधील सत्ताधारी लोकांकडून पैशांची पाकिटेही मिळतात असे अधून मधून बोलले जात असते. एका पदाधिकाऱ्याची ची तर औषधे सुद्धा पालिकेमधील बडा पदाधिकारी दर महिन्याला फुकट पुरवतो अशीही चर्चा पालिकेमध्ये आहे. 

असाच अनुभव पालीकेमध्ये वृत्तासंकालन करणाऱ्या पत्रकारांना २०११ मधील दिवाळी नंतर आला. पालिकेमधील एका बड्या पदाधिकाऱ्याने नामांकित पेपरचे पत्रकार म्हणवणाऱ्याच्या घरी होम थेटर पाठवल्याची पालिकेमध्ये जोरदार चर्चा होती. आता पुन्हा दिवाळी जवळ आली असताना ४ नामांकित पेपरचे पत्रकार एका नगरसेवकाला भेटून आम्हाला मोबाईल घेवून द्या बाकीच्यांची काळजी करू नका असे सांगितल्याने कामिटीमधील पत्रकारान विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.

असे सगळे प्रकार घडत असताना या सर्व नामांकित पेपरचे पत्रकार म्हणवणाऱ्याना कधीही असे वाटले नाही कि हे जे प्रकार आपण करतो आहोत हे चुकीचे आहे. आज जो पेपर आहे उद्या तो नसेलही याचा कधीही विचार यांच्या मनात येत नाही. असो एवढे मात्र नक्की या १० टक्के स्वार्थी पत्रकारांमुळे पालीकामध्ये वृत्तसंकलन करणाऱ्या ९० टक्के पत्रकारांवर अन्याय होत आहे. हा अन्याय थांबवायचा असल्यास नामांकित पेपरचे पत्रकार जे या कमिटीवर आहेत त्या पेपरच्या संपादकांनी आपले पत्रकार काय दिवे लावत आहेत याची माहिती घेणे जरुरीचे आहे. अन्यथा एकदिवस असा येईल कि या स्वार्थी पत्रकारांमुळे नामांकित पेपरचे नाव बदनाम झालेले असेल.

अजेयकुमार जाधव 
mob.9969191363
http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website )

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS