डॉ. आंबेडकर यांची फेसबुकवर बदनामी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2012

डॉ. आंबेडकर यांची फेसबुकवर बदनामी


पुणे / वृत्तसंस्था : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल फेसबुकवर "आय हेट आंबेडकर"या नावाच्या पेज वरून बाबासाहेब आंबेडकर यांच्या आक्षेपार्य लिखाण केल्यावर हे पेज मुंबईच्या सायबर क्राईम विभागाने मागील वर्षी बंद केले असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एका तरुणाने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. लष्कर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण यांनी सांगितले.

या प्रकरणी मनोज कांबळे (रा. रामटेकडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. कांबळे हे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीला आहेत. त्यांचे फेसबुकवर अकाऊंट आहे. नवनाथ सातव याने डॉ. आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून तो कांबळे यांच्या वॉलवर टॅग केला. ही बाब कांबळे यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. संवेदनशील विषय असल्याने पोलिसांनीही तातडीने गुन्हा नोंदवून शून्य प्रहरात हा गुन्हा लष्कर पोलीस ठाण्याकडे वर्गकेला. या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समजते. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यात येणार असून समाजामध्ये तेढ निर्माण न होऊ देण्यासाठी सर्वानी शांतता राखण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण करीत आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS