मुंबई : सेंच्युरी मिल कामगार एकता मंचाच्या विद्यमाने रविवारी दि. 2 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 10 वाजता गणेश टॉकीज इमारत पहिला माळा, चिंचपोकळी, लालबाग येथे सेंच्युरी मिल कामगारांचा मेळावा आयोजित केलेला आहे.
तरी सर्व कामगारांनी मोठय़ा संख्येने हजर राहावे असे कमिटीचे पदाधिकारी सर्वश्री नंदू पारकर, हेमंत गोसावी, विलास कुलकर्णी, विश्वास वाणी, विकास वेदक, एम. डी. भट, शंकर बासा, सुधाकर रायकर, प्रकाश शेवणी यांनी आवाहन केले आहे. प्रास्ताविक विषय पुढीलप्रमाणे: 1) 13 हजार चौरस मीटरवरील बांधकाम म्हाडाने त्वरित सुरू करावे. 2) संक्रमण शिबिराची 700 घरे सेंच्युरी मिल कामगारांना द्यावीत. 3) बिर्ला शेठ व नसली वाडिया यांच्या वादात अडकलेली 5000 चौ. मी. जागा सेंच्युरी मिल कामगारांच्या बांधकामासाठी मोकळी करावी. 4) तसेच इतर कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलावी यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे, असे नंदू पारकर यांनी कळवल आहे.
Post Top Ad
29 November 2012
Home
Unlabelled
सेंच्युरी कामगारांचा रविवारी मेळावा
सेंच्युरी कामगारांचा रविवारी मेळावा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment