मुंबई : अल्पसंख्याक असणार्या शाळा, वसाहती यांच्यावर महानगरपालिकेने विकासकामाच्या नावाखाली जो मनमानी कारभार सुरू केला आहे. तो त्वरित थांबवावा, अशी मागणी सेव्ह अवर लॅण्ड कमिटीने बुधवारी पत्रकार संघ येथे केली आहे. कांदिवली येथील सेंट जोसेफ हायस्कूल व सेंट अँन्थनी चर्च या ठिकाणी नाला व इतर विकासकामांमुळे पावसाळ्यात धोका निर्माण होणार आहे. पर्यायी व्यवस्था असताना हा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे संस्थेच्या वतीने 1 डिसेंबरला कांदिवली येथे शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जमीन संपादनाचे आदेश कायमचे रद्द व्हावेत, दफनभूमीसाठी पश्चिम उपनगराच्या पूर्वेकडील जमीन उपलब्ध करून द्यावी. या व आदी मागण्या त्वरित मान्य न झाल्यास शांती मोर्चानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉल्फी डिसोझा यांनी या वेळी दिला.
Post Top Ad
29 November 2012
Home
Unlabelled
अल्पसंख्याक समाजाच्या जमिनी वाचवा
अल्पसंख्याक समाजाच्या जमिनी वाचवा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment