अल्पसंख्याक शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 November 2012

अल्पसंख्याक शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ


मुंबई : राज्यातील अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी राबवण्यात येत असलेल्या दोन लाख रुपये अनुदान योजनेसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करण्याची मुदत 12 नोव्हेंबर 2012 पर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी दिली. ही मुदत 30 ऑक्टोबर 2012 पर्यंत होती.

खाजगी अल्पसंख्याकबहुल शाळांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही खान यांनी केले आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 30 ऑक्टोबरपर्यंत होती; पण मुदतीत अर्ज करू न शकल्याने अनेक संस्थांनी या योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता अर्ज करण्यासाठी 12 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करता येईल. या अनुदानातून अल्पसंख्याकबहुल खाजगी शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालय, संगणक कक्ष, ग्रंथालय, शाळेतील बाक-टेबल आदी साहित्य खरेदी, वर्गखोलीचे बांधकाम आदी पायाभूत सुविधा उभारता येऊ शकतात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS