म्हाडा , बीपीटीसह विविध सरकारी यंत्रणांकडून सुमारे ८५९ कोटीची पाण्याची थकबाकी शिल्लक असतानाच मंत्रालयातील विविध विभागांतून अनुदान , मालमत्ता कर , मलनिःसारण कर आणि पाणीपट्टीपोटी तब्बल दोन हजार कोटी रुपये महापालिकेला येणे असल्याचे उघडकीस आले आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी
पालिका व मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे खरी ,मात्र तिची बैठकच अनेक वर्ष झाली नसल्याचेही निर्दशनास आले आहे.
गृहनिर्माण , सार्वजनिक आरोग्य , गृह , शालेय शिक्षण , महसूल , उच्च व तंत्र शिक्षण विभागासह एकूण २४ खात्यांची ही थकबाकी असून ती वसूल करण्यासाठी पालिकेतर्फे गेली अनेक वर्ष पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र ,
नियमित वेळेत थकबाकी वसूल होत नसल्याने मूळ रकमांच्या व्याजात मोठ्या प्रमाणात वाढ होत ३१ ऑगस्ट २०१२पर्यंत ही रक्कम २ , २६४ कोटी इतकी झाली आहे. पालिकेकडूनही काही थकबाकी सरकारला येणे आहे. दोन्ही बाजूच्या थकबाकी रकमांच्या ताळमेळाची प्रक्रिया पार पाडण्याकरिता पालिका अधिकारी व
सरकारतर्फे नगरविकास , वित्त , गृहनिर्माण , सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांची समिती नेमली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी थकबाकीचा तपशील सरकारला दिला आहे. मात्र , काही थकबाकीबाबत दोन्ही यंत्रणांमध्ये एकमत होत नसल्याचे आढळून आले आहे.
Post Top Ad
16 November 2012
Home
Unlabelled
सरकारकडे पालिकेचे २ हजार कोटी
सरकारकडे पालिकेचे २ हजार कोटी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment