मुंबई : इंदू मिलच्या जागेबाबत सरकारने 5 डिसेंबरपर्यंत निर्णय घेऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न गांभीर्याने सोडावावा; अन्यथा समाजवादी पक्ष तीव्र आंदोलन करून ६ डिसेंबर रोजी आंबेडकरी जनतेच्या खांद्याला इंदू मिलच्या जागेचा ताबा घेईल, असा इशारा सपाचे महासचिव मिराज सिद्दिकी, नगरसेवक याकूब मेनन, नगरसेवक निरंजन पाटील आदी पदाधिकार्यांनी गुरुवारी आझाद मैदानात दिला. डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी सरकार वेळकाढूपणा करत आहे हे योग्य नाही, असे सांगत मिराज सिद्दिकी म्हणाले, दलित आणि मुस्लीम धर्मियांसाठी बाबासाहेबांनी भरपूर काही भारतीय राज्य घटनेतून दिले, आता मुस्लीम समाजातील लोकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनतेला काही देण्याची वेळ आली आहे. मुस्लीम जनतेने आंबेडकरी जनतेच्या सोबत खांद्याला खांदा लावून इंदू मिलचा ताबा घ्यावा व आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिल मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन मिराज सिद्दिकी यांनी केले.
Post Top Ad
30 November 2012
Home
Unlabelled
६ डिसेंबरला समाजवादी पक्षही घेणार इंदू मिलचा ताबा
६ डिसेंबरला समाजवादी पक्षही घेणार इंदू मिलचा ताबा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment