मुंबई : उपनगरीय रेल्वेने प्रवास करताना कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ सोबत घेऊन प्रवास करणे गुन्हा असला तरी अनेकदा रॉकेलचा कॅन, मॅच बॉक्स, स्पिरिट ,गॅस सिलिंडर घेऊन प्रवासी प्रवास करतात. असे प्रवासी लोकलमध्ये आढळल्यास कोणत्या क्रमांकावर रेल्वेला कळवायचे? असा प्रश्न प्रवाशांना पडतो. प्रवाशांच्या या प्रश्नाला पश्चिम रेल्वेने 9004441888 हानवा हेल्पलाइन क्रमांक सुरू करून उत्तर दिले आहे. लोकलमधून प्रवास करत असताना ज्वलनशील पदार्थ सोबत घेऊन प्रवास करणे, हा कायद्याने गुन्हा आहे; परंतु अनेकदा जाऊ दे कोण तपासतो, असा विचार करत प्रवासी ज्वलनशील पदार्थासोबत प्रवास करतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. त्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने 9004441888 हा सुरक्षा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. तसेच पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांमध्ये जनजागृती मोहीमही राबवण्यात येत आहे. यासाठी रेल्वे स्थानकांवर पोस्टर्स, लोकलमध्ये स्टिकर्स लावण्यात येत आहेत. तसेच प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. लोकलमधून ज्वलनशील पदार्थ वाहून नेण्याच्या गुन्ह्याखाली तीन वर्षाची शिक्षा आणि 1 हजार रुपयांपर्यंत दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
|
Post Top Ad
07 November 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment