चित्रा साळुंखे यांना पुन्हा सेवेत घ्या - उच्च न्यायालय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 December 2012

चित्रा साळुंखे यांना पुन्हा सेवेत घ्या - उच्च न्यायालय


मुंबई : आयपीएस अधिकारी के. एल. बिष्णोई यांच्याविरोधात तक्रार केल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकून निलंबित करण्यात आलेल्या सिद्धार्थ विधी महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या चित्रा साळुंखे यांना पुन्हा सेवेत सामावून घ्या, असा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.

आयपीएस पोलीस अधिकारी पोलीस महानिरीक्षक के. एल. बिष्णोई यांनी सहा वर्षापूर्वी सिद्धार्थ विधी महाविद्यालयातून एलएलबीची पदवी मिळवली होती. तिसर्‍या वर्षाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत बिष्णोई गैरहजर होते. परीक्षा विद्यार्थ्यांच्या 15 नावांच्या छापील यादीत त्यांचे नाव नव्हते, मात्र त्यांचे नाव हाताने लिहून परीक्षेपूर्वीच त्यांच्या नावासमोर मार्क देण्यात आले होते. मालाच सिद्धार्थ लॉ कॉलेजच्या तत्कालीन व्याख्यात्या तसेच माजी उपप्राचार्या चित्रा साळुंके यांनी आक्षेप घेतल्याने त्या वादाच्या भोवर्‍यात अडकल्या होत्या.त्यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा लावून महाविद्यालयाने त्यांनाच सेवेतून निलंबित केले होते. पोलिसांकडूनही साळुंखे यांना त्रास देण्यात आल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे आणि न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने सुनावणी करून चित्रा साळुंखे यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले. तसेच या आदेशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी म्हणून आपल्याच आदेशाला आठ आठवडे स्थगिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS