रेडिएशनच्या दुष्परिणामाचा शास्त्रीय पुरावा नाही- मिलिंद देवरा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेडिएशनच्या दुष्परिणामाचा शास्त्रीय पुरावा नाही- मिलिंद देवरा

Share This

मुंबई : एक्स्पोजरचे कमी प्रमाण आणि आतापर्यंतच्या संशोधनांचे निष्कर्ष विचारात घेता बेस्ट स्टेशन व वायरलेस नेटवर्कमधून कमकुवत आरएफ सिग्नल यामुळे आरोग्यावर दुष्पपरिणाम होत असल्याचा कोणताही भक्कम शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) संदर्भ देत शुक्रवारी सरकारने जाहीर केले. आतापर्यंतच्या जमा केलेल्या पुराव्यांनुसार बेस्ट स्टेशनमधून येणार्‍या आरएफ सिग्नलमुळे आरोग्यावर अल्पकालीन वा दीर्घकालीन परिणाम झाल्याचे अद्याप आढळले नाही, अशी माहिती दूरसंचार व माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी दिली.

डब्ल्यूएचओने शिफारस केली आहे की, आपल्या नागरिकांचे आरएफच्या पातळीपासून रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय अधिकार्‍यांनी आंतरराष्ट्रीय प्रमाणकांचा अवलंब करायला हवा. एक्स्पोजरची मर्यादा कदाचित अधिक असलेल्या परिसरात त्यांनी निर्बध घालावेत. डब्ल्यूएचओने इंटरनॅशनल कमिशन ऑन नॉन-आयनायजिंग रेडिएशन प्रोटेक्शनने (आयसीएनआयआरपी) विकसित केलेल्या इंटरनॅशनल एक्स्पोजर गाइडलाइन्सचा संदर्भ घेतला आहे. दूरसंचार विभागाने सन 2009 मध्ये मोबाईल टॉवरच्या बाबतीत आयसीएनआयआरपीने निर्देशित केलेल्या इलेक्ट्रो मायग्नेटिक फिल्ड्स (इएमएफ) नियमांचा अवलंब केला आहे. इंटर-मिनिस्टरियल कमिटीच्या शिफारशींच्या आधारे बेस्ट ट्रान्समीटिंग स्टेशन (बीटीएस) रेडिशन मर्यादा 1 सप्टेंबर 2012 पासून आयसीएनआयआरपीने निर्धारित केलेल्या मर्यादांच्या एक दशमांश करण्यात आल्या आहेत. दूरसंचार विभागाच्या टेलिकॉम एन्फोर्समेंट, रिसोर्स अँण्ड मॉनिटरिंग (टीईआरएम) सेल्स बीटीएस साइटच्या 10 टक्के आहेत. तसेच ज्या बीटीएस साइट्सविरोधी लोकांच्या तक्रारी आहेत त्यांचीही तपासणी टीईआरएम सेल्समार्फत केली आहे.
     

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages