हक्काच्या घरांसाठी सफाई कर्मचार्‍यांचा लाँगमार्च - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 November 2013

हक्काच्या घरांसाठी सफाई कर्मचार्‍यांचा लाँगमार्च

मुंबई - 29 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील २८ हजार सफाई कर्मचार्‍यांना मालकी हक्काचे घर मिळाले पाहिजे, यासह अन्य मागण्यांसाठी सफाई कर्मचारी विकास महासंघातर्फे कामगार नेते आणि आमदार विजय गिरकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सफाई कर्मचार्‍यांनी क्रॉफर्ड मार्केट ते आझाद मैदान असा लाँगमार्च काढला. या वेळी हजारो सफाई कर्मचार्‍यांनी जोरदार घोषणा देऊन आझाद मैदान दणाणून सोडले.

आपल्या मागण्यांसाठी गुरुवारी हजारो सफाई कर्मचारी लाँगमार्चमध्ये सामील झाले होते. याप्रसंगी भाजपाचे मुंबई अध्यक्ष अँड़ आशिष शेलार, उपमहापौर मोहन मिठबावकर, पालिका गटनेते दिलीप पटेल, नगरसेविका शैलजा गिरकर यांच्यासह कार्याध्यक्ष बाबाजी लाखण, सरचिटणीस अशोक कांबळे, शरद कांबळे, जयवंत पवार, उदय पडेलकर आदी पदाधिकारीही उपस्थित होते. दरम्यान, महापौर सुनील प्रभु यांना या वेळी १0 हजार घरांचे अर्ज देण्यात आले. या मागण्या ान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गिरकर यांनी दिला आहे. लाँगमार्चनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महापौर सुनील प्रभू आणि केंद्र सरकारच्या सफाई आयोगाच्या अध्यक्षांना सफाई कर्मचार्‍यांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS