बेस्ट चालवणार जादा बसेस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 November 2013

बेस्ट चालवणार जादा बसेस

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रविवार, १७ नोव्हेंबर रोजी राम गणेश गडकरी चौक-शिवाजी पार्क येथे श्रद्धांजली वाहण्याकरिता येणार्‍या नागरिकांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनातर्फे जादा बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून या जादा बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. दादर रेल्वे स्थानक (पूर्व) म्हणजेच स्वामी नारायण मंदिर येथून राम गणेश गडकरी चौक-शिवाजी पार्कपर्यंत नागरिकांच्या सोयीकरिता विशेष बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. तसेच या बसेसची माहिती नागरिकांना देण्याकरिता दादर रेल्वे स्थानक (पूर्व) येथे बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमधून म्हणजेच कुलाबा, बॅकबे, अंधेरी(पश्‍चिम) व अंधेरी (पूर्व) तसेच विक्रोळी, मुलुंड आणि नवी मुंबई या ठिकाणांवरून राम गणेश गडकरी चौक-शिवाजी पार्क येथे येण्याकरिता अनेक बस मार्ग उपलब्ध आहेत. या बस मार्गावरदेखील प्रवाशांच्या सोयीकरिता गरजेनुसार जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. तसेच या मार्गावरून परतीच्या प्रवासासाठीदेखील जादा बसगाड्यांची सोय करण्यात आलेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS