मुंबई : 'भारतातील प्रत्येकी दुसरे बालक कुपोषित आहे' अशा स्वरूपाचा अहवाल एनएफएचएसने दिला असून या अहवालाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी 'क्राय' या संस्थेतर्फे देशव्यापी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला सरकारने पाठिंबा द्यावा, असे आवाहन 'क्राय'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा मारवाह यांनी प्रेस क्लब येथे बुधवारी केले. मारवाह म्हणाल्या की, बूट पॉलिश करणारा, कुपोषित, अपंग आदी घटकांत मोडणारे बालक देशाचे आधारस्तंभ आहेत. १४ डिसेंबर या बालदिनी या मोहिमेला सुरुवात होणार आहे. बालकांना केंद्रस्थानी ठेवूनच सर्व धोरणे, कायदे, प्रक्रिया याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सर्व बालकांना परिपूर्ण आहार मिळालाच पाहिजे. भीक मागणार्या बालकांचा प्रश्न, बालकांचे वय निश्चित करावे, बालमृत्यू थांबवावेत, समान संधी समान विकास हे धोरण राबवावे, बालकांना होणारा अँनेमिक आजार नष्ट करावा, सक्तीचे मोफत शिक्षण देण्यात यावे, आदी सूचना 'क्राय'ने सरकारला केल्या आहेत.
Post Top Ad
14 November 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment