बाबासाहेबांच्या स्मारकासाठी लाल दिवा फोडो आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 November 2013

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी लाल दिवा फोडो आंदोलन

इंदू मिलचे आंदोलन पुन्हा पेटणार 
मुंबई / अजेयकुमार जाधव /  http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला इंदू मिलची जागा देण्याचे मान्य करूनही सरकारकडून स्मारक बांधण्याबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने रिपब्लिकन प्यान्थर ऑफ इंडिया संघटनेचे अध्यक्ष सचिन खरात यांनी ६ डिसेंबर रोजी सकाळी दादर चैत्यभूमी येथे लाल दिवा फोडो आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. सचिन खरात यांनी या आधी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालय असलेल्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर धडक देवून इंदू मिलची जागा मिळावी यासाठी आंदोलन केले आहे आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला इंदू मिलची जागा मिळावी म्हणून गेले कित्तेक वर्षे आंबेडकरी जनतेकडून राजकीय पक्षांकडून आंदोलने केली जात होती. या आंदोलनाची दखल घेत प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी इंदू मिलची जागा देण्याचे तत्वता मान्य केले होते. प्रधानमंत्र्यांनी मान्यता देवूनही स्मारकासाठी जागा देण्यात आली नसल्याने पुन्हा आंदोलन पेटल्यावर आनंद शर्मा यांनी लोकसभा व राज्यसभेमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाला जागा देण्याची घोषणा केली होती. लोकसभा व राज्यसभेमध्ये जागा देण्याची घोषणा करूनही गेल्या वर्षभरात सरकारकडून कोणत्याही प्रकारची कारवाही केली जात नसल्याचे आंबेडकरी जनतेच्या व संघटनांच्या निदर्शनास आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला इंदू मिलची जागा मिळावी म्हणून सामाजिक समता मंचचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी २२ नोव्हेंबरला इंदू मिल मध्ये जाऊन स्मारकाचे भूमिपूजन करू असा इशारा दिला आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सुद्धा २६ नोव्हेंबर पासून रस्त्यावर उतरून रस्ता रोको, रेल रोको, निदर्शने करणार असल्याचे सांगितले आहे. ५ डिसेंबर पूर्वी स्मारकाचे भूमिपूजन केले नाहीतर ६ डिसेंबरला आंबेडकरी जनतेच्या साक्षीने स्मारकाचे भूमीपूजन करण्याचा इशारा आठवले यांनी दिला आहे. विजय कांबळे, रामदास आठवले, सचिन खरात यांनी इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येणाऱ्या काही दिवसात सरकारने स्मारकाचे भूमिपूजन करण्याकडे व स्मारक बांधण्यासाठी प्राधिकरणाची घोषणा करण्याकडे दुर्लक्ष केल्यास इंदू मिलचे आंदोलन पुन्हा पेट घेणार आहे.  

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS