मानखुर्द / रशिद इनामदार / http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website )
१३ नोव्हेंबर २०१३

१३ नोव्हेंबर २०१३
शिवसेना शाखा मानखुर्द च्या महिला शिवसैनिकांनी ब्लु फिल्म्स सी डी विक्रेत्यावर हल्लाबोल करत मोठ्या संख्येने सी डी ताब्यात घेऊन होळी केली . वार्ड क्रं . १३६ च्या महिला आघाडी ने हि धाडसी कारवाई केली .
मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरात बरयाच दिवसांपासून हिंदी , मराठी सिनेमे तसेच इतर सी .डी बेकायदेशीररित्या विकल्या जात होत्या . त्यासोबत मोठ्या प्रमाणात ब्लु फिल्म्स च्या सी डी विकल्या जात होत्या . बऱ्याच दा समज देऊन ही अश्लील सी डी विक्री मानखुर्द पोलिस चौकी पासून काहीच अंतरावर राजरोसपणे सुरूच होती . शिवसेना शाखा मानखुर्द च्या महिलाआघाडी प्रमुख संगीता तेटमे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी आज या विक्रेत्यांवर हल्लाबोल करत या सी डींची होळी केली .


No comments:
Post a Comment