मुंबई / अजेयकुमार जाधव
(http://jpnnews.webs.com / JPN NEWS website)
नवी दिल्ली येथून एर्नाकुलम येथे जाणारी १२६१८ निझामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस नाशिक मधील इगतपुरी आणि घोटी दरम्यान शुक्रवारी सकाळी ६.२५ वाजता रुळावरून घसरली. या भीषण अपघातात तीन जण ठार झाले. अन्य २९ जण जखमी झाले आहेत. यातील १५ जण जबर जखमी आहेत. २३ जखमींवर नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल, ३ जणांवर वक्रतुंड हॉस्पिटल व ११ जणांवर घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मंगला एक्स्प्रेसचे एस-८, एस-९, एस-१०, एस-११, बी-१, बी-२, बी-३, ए-१, जीएस-१ आणि एसआरएल हे दहा डबे रुळावरून घसरले असून त्यातील एक डबा पलटी झाला आहे. या अपघातामुळे नाशिक- मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस मनमाडला थांबली आहे. मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेस निफाडजवळ थांबली आहे. मनमाड-कुर्ला राज्य राणी एक्स्प्रेस लासलगावला थांबली आहे.
प्रवाशांच्या मदतीसाठी मदत व बचाव पथक तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस येथून विशेष २२ डव्यांची गाडी घटनास्थळी पोहचली आहे. तसेच इगतपुरी येथून १० बसेस मदतीसाठी पाठवल्या आहेत. ४५० प्रवाशांना बस द्वारे इगतपुरी रेल्वे स्थानकावर आण्यात आले असून विशेष ट्रेन द्वारे या प्रवाश्यांना एर्नाकुलम येथे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर अपघातामुळे २२१०२- राज्य राणी एक्स्प्रेस , १२११०- गोदावरी एक्स्प्रेस , ५११५४- भुसावळ मुंबई पॅसेंजर, १७६१८- तपोवन एक्स्प्रेस, २२१०७- राज्य राणी एक्स्प्रेस, १२१०९- गोदावरी एक्स्प्रेस, ५११५३- भुसावळ पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
रेल्वे हेल्पलाईन क्रमांक -
कल्याण- ०२५१ २३११४९९, इगतपुरी- १२५५३ २४४०२०, पनवेल- ०२२ २७४६८८३३, सीएसटी- ०२२ २२६९४०४०


No comments:
Post a Comment