मरेचा मेगाब्लॉक, तर परेचा जम्बोब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2013

मरेचा मेगाब्लॉक, तर परेचा जम्बोब्लॉक

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाइन आणि हार्बर मार्गावर रविवार, २४ नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर कल्याण ते ठाणे स्थानकां दरम्यान अप जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावर पनवेल ते नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

मेन लाइनवर कल्याण ते ठाणेदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी १0.४0 ते दुपारी ३.१0 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान कल्याण ते ठाणेदरम्यानची अप जलद मार्गावरील वाहतूक अप धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर पनवेल ते नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान पनवेल ते नेरूळ स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक सकाळी १0.४१ ते दुपारी ३.२७ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेल ते नेरूळ स्थानकां दरम्यानची अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक सकाळी ११.0५ ते दुपारी ३.१९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. याशिवाय पनवेल ते अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन वाहतूक सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते नेरूळ आणि ठाणे ते नेरूळ स्थानकांदरम्यान विशेष लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक काळामध्ये गाड्यांना प्रचंड गर्दी होते, अशा वेळी प्रवाशांनी जास्त गर्दी झालेल्या लोकलमधून प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.उपनगरीय रेल्वेच्या दुरुस्तीसाठी पश्‍चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव ते बोरिवली स्थानकांदरम्यान रविवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १0.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान गोरेगाव ते बोरिवली स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक अप आणि डाऊन धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. तसेच काही उपनगरीय लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच बोरिवली लोकल प्लॅटफार्म ७, ८ आणि २ वर थांबविण्यात येणार आहेत, तर मेल-एक्स्प्रेस गाड्या बोरिवली स्थानकात प्लॅटफॉर्म ६, ६ अ आणि ३ वर थांबविण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS