मुंबई : कॅम्पा कोलातील अनधिकृत बांधकामाविरोधात पालिका आयुक्तांवर एमआरटीपी अंतर्गत नोटीस बजावण्याची मागणी भाजपाचे गटनेते दिलीप पटेल यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली. कॅम्पा कोलातील अनधिकृत फ्लॅटमधील रहिवाशांना न्याय मिळण्यासाठी भाजपाचे गटनेते दिलीप लांडे यांनी यापूर्वी सभागृहात आवाज उठवला होता. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या नगरसेवकांनी आयुक्तांना घेराव घातला. त्या प्रकरणाकडे पुन्हा त्यांनी बुधवारी स्थायी समितीचे लक्ष वेधले. कॅम्पा कोलाची जमीन महापालिकेची आहे त्यामुळे ही जमीन भाडे करार तत्त्वावर देण्यात आली असून, या जमिनीच्या मोबदल्यात महापालिका कॅम्पा कोलाकडून भाडे वसूल करत आहे. या जमिनीवर बांधण्यात आलेल्या विकासकावर कारवाई न करता उलट तेथे राहत असलेल्या रहिवाशांना रस्त्यावर यावे लागले आहे. न्यायालयातदेखील या विषयी कॅम्पा कोलाची बाजू मांडण्यात आलेली नाही. यासंदर्भात विकासकावर मोफ्फा (१९६३)(एमओएफए) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, तत्कालीन महापालिकेचे संबंधित खात्याच्या अधिकार्यांवर एफआयआर नोंदवून कायदेशीर कारवाई करावी तसेच अकार्यक्षम पालिका आयुक्तांविरोधात एमआरटीपीची नोटीस बजावावी, अशी मागणी पटेल यांनी बुधवारी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे स्थायी समितीच्या बैठकीत केली.
Post Top Ad
14 November 2013
Home
Unlabelled
पालिका आयुक्तांवर एमआरटीपीची नोटीस बजावण्याची भाजपाची मागणी
पालिका आयुक्तांवर एमआरटीपीची नोटीस बजावण्याची भाजपाची मागणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment