मुंबई : कासार समाजाचा समावेश भटक्या विमुक्त जातीत करण्याची मागणी सोमवारी आझाद मैदानात झालेल्या महामेळाव्यात करण्यात आली. कासार समाजाला नेतृत्व देण्यासाठी राज्य सरकारने माजी नगरपाल किरण शांताराम यांची राज्यसभेवर शिफारस करावी, अशी मागणीही या वेळी अखिल भारतीय कासार महासंघाने केली.
भारतीय राज्य घटनेनुसार कासार समाज इतर मागासवर्गात (ओबीसी) आहे. या समाजातील ओतारी ही उपजात भटक्या जमातीमध्ये (एनटी) असल्याने एकाच समाजातील दोन उपजातींना वेगळा न्याय देऊ नये. शासनाने यापूर्वी काढलेल्या परिपत्रकात दुरुस्ती करावी, तसेच कासार समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी, विद्यार्थ्यानसाठी महाराष्ट्र शासनाने विविध सवलती देण्या बाबत निवेदन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले असल्याचे महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर मांगुळकर यांनी सांगितले आहे.


No comments:
Post a Comment