भांडुपमधील बुद्धविहार तोडले - रहिवासी संतप्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 November 2013

भांडुपमधील बुद्धविहार तोडले - रहिवासी संतप्त



श्याम नगर झोपडपट्टीवर पूर्वसूचना न देता कारवाई
मिठागर विभागाने सोमवारी भांडुपमधील श्याम नगर झोपडपट्टीवर पूर्वसूचना न देता कारवाई केल्याने तसेच या कारवाही मध्ये बुद्ध विहार सुद्धा तोडले असल्याने रहिवासी संतप्त झाले होते. सदर कारवाई करत मिठागर विभागाने १५0 झोपड्या जमीनदोस्त केल्या. पोलिसांच्या फौजफाट्यात ही कारवाई करण्यात आली असली तरी कारवाईला विरोध करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर संतप्त रहिवासी रस्त्यावर उतरले होते.

श्याम नगर परिसरातील सुमारे सात एकर मोकळ्या भूखंडावर पाचशेहून अधिक झोपड्यां आहेत. येथील झोपड्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर माथाडी कामगार व बौद्ध समाजातील लोक वास्तव्य करत आहेत. मात्र हा भूखंड मिठागर विभागाचा असल्याचा दावा करत संबंधित प्राधिकरणाने जागा रिकामी करण्याबाबत नोटीस धाडल्या आहेत. यावर ही जागा मिठागर विभागाची नाही तर खासगी मालमत्ता आहे, असा दावा रहिवाशांनी केला असून शिवाय न्यायालयातही धाव घेतली आहे. येथील ३६ रहिवासी या प्रकरणी सत्र न्यायालयात लढत आहेत. १९९५ पूर्वीपासून येथे वास्तव्य करत असतानाही प्रशासनाने आम्हाला बेघर करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. १२ नोव्हेंबर रोजी देखील येथील ३५0 झोपड्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र सोमवारी पूर्वसूचना न देता कारवाई केल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS