जदयु नेते तिवारींचा सवाल
नवी दिल्ली : क्रिकेटमधून नवृत्ती घेतलेल्या विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर होण्यावर आक्षेप घेण्याची मालिका सुरू झाली आहे. संयुक्त जनता दलाचे वरिष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनीही सचिनला 'भारतरत्न' देण्यावर सोमवारी प्रश्न उपस्थित केला आहे. सचिनने काही फुकटात क्रिकेटची सेवा केली नाही. क्रिकेटच्या माध्यमातून त्याने कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यामुळे सचिनला 'भारतरत्न' कशाला देता, असे तिवारी म्हणाले.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला 'भारतरत्न' देण्याला शिवानंद तिवारींनी कडवा विरोध दर्शविला आहे. हॉकीचा जादूगार ध्यानचंद, बिहारचे नेते कपरुरी ठाकूर यांच्यासह इतर अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्व आहेत, ज्यांना सचिनच्या पूर्वी 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करायला पाहिजे, असेही तिवारी म्हणाले. क्रिकेटमध्ये सध्या बेहिशेबी पैसा खेळू लागला आहे. त्यामुळे इतर खेळांचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कोट्यवधी रुपये कमावणार्यांना 'भारतरत्न' मिळत आहे. सध्याच्या काळात हा पुरस्कार देण्याचे कोणतेही औचित्य उरले नाही. त्यामुळे ही परंपरा मोडीत काढण्याची मागणी तिवारी यांनी केली. दरम्यान, सचिनला 'भारतरत्न' जाहीर झाल्यामुळे उत्साह संचारलेल्या सचिनच्या चाहत्यांचा तिवारींच्या भूमिकेमुळे हिरमोड झाला आहे. याचवेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाही 'भारतरत्न' देण्याची मागणी लावून धरली आहे

No comments:
Post a Comment